कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील माळभागा येथील भर वस्तीत असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स मध्ये तीन चोरट्याने फ्लॅटमध्ये घुसून महिलेचे तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन दोन तोळ्याची चेन, रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा 1 लाख 11हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. भर दिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.