Diwali Firecrackers Price Hike | यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या किमतीत 30 ते 50 टक्क्यांपर्यंत मोठी दरवाढ होण्याची शक्यता

Diwali Firecrackers Price Hike | ग्राहकांच्या खिशाला कात्री : न्यायालयीन निबंधांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Firecrackers
Firecrackers
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : राजेंद्र जोशी
कच्च्या मालाच्या किमतीमधील वाढ, आंतरराष्ट्रीय भू-राजकीय तनाव, वाहतुकीतील अडथळे आणि मागणी-पुरवठ्यातील तफावत यामुळे फटाक्यांच्या किमतीत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दिवाळीच्या आतषबाजीसाठी यंदा ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार असून यंदाची दिवाळी खरेदी ग्राहकांच्या खिशाला अधिक महाग पडणार आहे.

Firecrackers
Kolhapur News: कोल्हापूर हादरलं! मंदिरासमोरच ९ वीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर अन् दंडावर सपासप वार; हत्येने माणगावात खळबळ

याखेरीज न्यायालयीन निबंधांमुळे सुरक्षेचे नियम पाळण्याचे आव्हानही ग्राहकांसमोर असणार आहे. देशातील फटाक्यांच्या उत्पादनापैकी सुमारे ९० टक्के उत्पादन तामिळनाडूतील शिवकाशी येथे होते. येथे १ हजार ७० परवानाधारक उत्पादन केंद्र असून या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे सात हजार कोटी रुपये आहे.

इंडियन फायरवर्क्स असोसिएशनचे अध्यक्ष जे. तमिलसेल्वन यांच्या मते, कच्च्या मालाबरोबरच कागद, डुप्लेक्स बोर्ड, सूत, लेबल्स आणि पॅकेजिंग साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून उत्पादकांना नेहमीप्रमाणे सवलती देणे शक्य होणार नाही.

Firecrackers
Kolhapur Drought: कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यात दुष्काळ जाहीर; सर्वाधिक पाऊस पडलेल्या राधानगरी, गगनबावड्याचा समावेश

फटाक्यांच्या दुकानांमध्ये किमान १५ मीटर अंतर ठेवावे, एका ठिकाणी ५० पेक्षा अधिक दुकानांना परवानगी देऊ नये आणि त्यासाठी पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनची पूर्वपरवानगी घ्यावी, अशी मागणी उत्पादक संघटनेने सरकारकडे केली आहे.

कच्च्या मालाची दरवाढ

इंडियन फायरवर्क्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या मते, फटाकेनिर्मितीत महत्त्वाच्या सल्फरची किंमत प्रतिकिलो १०० रुपये आहे. अल्युमिनियम, सोडियम नायट्रेट आणि सॉल्टपिट्ररच्या किमतीही वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या खर्चात सरासरी ३० टक्के वाढ झाली. शिवकाशीतील काही उत्पादन केंद्र बंद असल्याने यंदा मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news