कोल्हापूर : फये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग

फये ( ता. भुदरगड ) लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
फये ( ता. भुदरगड ) लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
Published on
Updated on

मिणचे खुर्द : पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यातील फये लघू पाटबंधारे प्रकल्प आज सकाळी ६. १५ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस झाल्याने ३३.४२ मीटर उंची व ३५५.६५ मीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाची १३८.८८ दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक क्षमता आहे. प्रकल्पात पूर्ण पाणीसाठा झाला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

प्रकल्पांतर्गत ९७२ हेक्टर लाभक्षेत्र असून सिंचन क्षेत्र ७०० हेक्टर आहे. शेतीच्या पाण्यासाठी मोर, ओहोळेवर बारा बंधारे बांधण्यात आलेले आहेत. प्रत्येक वर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. यावर्षी प्रकल्पात उशीरा पाणीसाठा करण्यात आला. तसेच पावसाने उसंत दिल्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरेल की नाही याची चिंता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लागली होती. सध्या हा प्रकल्प आज सकाळी ६. १५ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभक्षेत्रातील बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news