कोल्हापूर : सावधान! जिल्ह्यात डोळे येण्याची साथ फैलावतेय

कोल्हापूर : सावधान! जिल्ह्यात डोळे येण्याची साथ फैलावतेय

कोल्हापूर, आशिष शिंदे : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे; मात्र पावसामुळे संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या राज्यभर लहान मुलांमध्ये आय फ्लू अर्थात डोळे येण्याची साथ आली असून जिल्ह्यातही याचा फैलाव सुरू झाला आहे. कोल्हापुरात आजअखेर 204 जणांना डोळ्याचा संसर्ग झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कोल्हापुरात डोळे येण्याचे सर्वाधिक रुग्ण हातकणंगले तालुक्यात आढळले आहेत. तेथे 78 तर शिरोळ येथे

77 रुग्ण आढळले आहे. लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. डोळ्यांचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी संसर्गाचा वेग जास्त आहे; मात्र याला घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून फक्त योग्य ती काळजी घेण्याची अवश्यकता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

अशी आहेत लक्षणे

डोळे लाल होणे
डोळ्यातून सतत पाणी येणे
डोळ्यांची जळजळ
दोन्ही डोळ्यांना सूज येणे
डोळ्यांची खाज येणे
पापण्या एकमेकांना चिकटणे

अशी घ्या काळजी

डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धुवावे.
डोळ्याचा संसर्ग झाल्यास कुटुंबापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करा.
इतरांचा रुमाल, टॉवेल वापरू नये.
संसर्ग झालेल्या व्यक्तींनी काळा गॉगल अथवा चष्मा वापरावा.
संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news