कोल्हापूर शहराची खाद्य, वस्त्र अन् वास्तू संस्कृती ’सायबर’मध्ये एकवटली

कोल्हापूर : ‘हेरिटेज कोल्हापूर’ प्रदर्शनात मार्गदर्शन करताना अभिनेता स्वप्निल राजशेखर. शेजारी उपस्थित उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, विकास पाटील, अजित जाधव, यशोधन जोशी, प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी आदी.
कोल्हापूर : ‘हेरिटेज कोल्हापूर’ प्रदर्शनात मार्गदर्शन करताना अभिनेता स्वप्निल राजशेखर. शेजारी उपस्थित उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, विकास पाटील, अजित जाधव, यशोधन जोशी, प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी आदी.

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ग्रीन चिकन समोसा, मल्टी ग्रेन वडा, खर्डा चिकन, चिकन लोणचं असे चमचमीत खाद्यपदार्थ, कोल्हापुरी नऊवारी साडी, रांगडा फेटा, नाजूक नथ, आकर्षक कोल्हापुरी साज अशी वैशिष्ट्ये आणि सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या वास्तूंची विविधता 'सायबर'मध्ये एकवटली.

निमित्त होतं दैनिक 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'हेरिटेज कोल्हापूर' या विशेष उपक्रमाचे. जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने सायबरमध्ये 'खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती, वास्तू संस्कृती' या विषयावर प्रदर्शन व व्याख्यान असा अनोखा उपक्रम झाला. यावेळी 'पुढारी'च्या यू-ट्यूब चॅनेलवरील टाऊन हॉल वास्तूचा माहितीपट दाखवण्यात आला. असा सर्वसमावेशक उपक्रम कोल्हापुरात प्रथमच आयोजित केला आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर व ?उपाध्यक्ष सचिन शानबाग यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी वास्तुविशारद अजित जाधव, सिनेअभिनेता स्वप्निल राजशेखर व विकास पाटील, इतिहास अभ्यासक यशोधन जोशी, प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, टोमॅटो एफएफचे आरजे विश्वराज जोशी आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नागेशकर म्हणाले, कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीला जगभर मान आहे. इथली माणुसकी जगात भारी आहे. सचिन शानबाग म्हणाले, कोल्हापूर पर्यटनाने परिपूर्ण शहर असून जगभरातील पर्यटकांचे हे आकर्षण केंद्र आहे. अभिनेता स्वप्निल राजशेखर म्हणाले, कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीने संपूर्ण भारताला उभारी देण्याबरोबरच सिनेसृष्टीचा पाया भक्कम केला. विकास पाटील यांनी कोल्हापूरचे वेगळेपण मर्यादित न ठेवता ते व्यापक बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सर्वांचे स्वागत फूड टेक्नॉलॉजी विभागप्रमुख श्वेता पाटील, इंटिरिअर विभागप्रमुख अमर मेस्त्री यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी उपाध्ये, पाहुण्यांची ओळख प्रा. तेजस्विनी चिले, तेजस्विनी आळवेकर यांनी करून दिली. प्रा.आदर्श चव्हाण यांनी आभार मानले.

यावेळी तात्यासाहेब तेंडुलकर कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल ज्यु. कॉलेज, मेन राजाराम ज्यु. कॉलेज, पद्माराजे, केएमसी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

'हेरिटेज कोल्हापूर' प्रदर्शन आजही खुले राहणार

दरम्यान, 'हेरिटेज कोल्हापूर' हे अनोखे प्रदर्शन बुधवारी सर्वांसाठी खुले राहणार आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत याचा लाभ इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी व पर्यटकांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news