डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी : डॉ. कामत

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी : डॉ. कामत
Published on
Updated on

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी हा सक्षम व्हावा, हा द़ृष्टिकोन ठेवून डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने अंगीकारलेली शिक्षण प्रणाली प्रशंसनीय आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभिप्रेत शैक्षणिक वाटचाल विद्यापीठाने यापूर्वीच सुरू केली असल्याचे गौरवोद्गार डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी काढले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 18 व्या स्थापना दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमात स्त्री शिक्षणासाठी योगदान देणार्‍या ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांना डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, सर्वोत्तम कर्मचारी, सर्वोत्कृष्ट प्राध्यापक आदींचा सत्कार करण्यात आला.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी ताराराणी विद्यापीठाच्या स्त्री शिक्षणासाठीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढत संस्थेला संगणकासाठी 11 लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर ताराराणी विद्यापीठ खासगी विद्यापीठामध्ये रूपांतर करावे, असे सूचित केले.

सन्मानाला उत्तर देताना डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीत अतुलनीय योगदान देणारे पद्मश्री डी. वाय. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार मिळत असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम स्त्री शिक्षणासाठी ताराराणी विद्यापीठाला देणार आहे.

डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, मेघराज काकडे, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कृषी व तंत्र विद्यापीठचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, अभिमत विद्यापीठाचे वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख अधिकारी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news