Kolhapur News | मधमाश्या मारू नका, व्हॅक्यूम मशिन वापरून ‘स्थलांतरित’ करा

Kolhapur Bee Rescue | पर्यावरणप्रेमी दिनकर चौगुले यांनी समस्येवर पर्यावरणपूरक आणि अद्भुत उत्तर शोधलं
Kolhapur Bee Rescue
Save Honeybees(File Photo)
Published on
Updated on
तानाजी खोत

Kolhapur Bee Rescue

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील उंच इमारती, गच्ची, पाण्याच्या टाक्या यावर बसलेली मधमाश्यांची पोळी आपण अनेकदा पाहिली असतील. या मधमाश्या चावल्यामुळे नागरिक जखमी होणे, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणे अशा घटना अधून मधून घडत असतात. त्यामुळे भीतीपोटी अनेकदा ही मधमाश्यांची पोळी जाळली जातात किंवा कीटकनाशक टाकून नष्ट केली जातात; पण मधमाश्या नष्ट करणे म्हणजे पर्यावरणाचा विनाश आहे. कारण, या छोट्या जीवांचा अन्नसाखळीतील परागीभवनात पर्यायाने जगाच्या अन्न सुरक्षेत महत्त्वाचा वाटा आहे.

या समस्येवर पर्यावरणपूरक आणि अद्भुत उत्तर शोधलं आहे पर्यावरणप्रेमी दिनकर चौगुले यांनी. त्यांनी स्वतःच एक व्हॅक्युम मशिन तयार केले असून त्या मशिनच्या साह्याने मधमाश्या न मारता अलगदपणे गोळा केल्या जातात. ते पोळे अलगद काढून जंगलातील एका झाडावर ठेवले जाते. एका कंटेनरमध्ये गोळा केलेल्या माश्या तिथे सोडल्या जातात. नव्या ठिकाणी पुनर्वसन झालेल्या या पोळ्यातील पिले पूर्ण वाढ होऊन उडून जाण्यासाठी 17-18 दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत माशांची कॉलनी जंगलात तिथेच राहते, नंतर पुढे स्थलांतरित होते.

Kolhapur Bee Rescue
Kolhapur : वासरू तडफडले... घशातून प्लास्टिक काढले

या वर्षात कोल्हापूरमधून 50 पेक्षा अधिक पोळ्यांचे अशा पद्धतीने स्थलांतर दिनकर चौगुले आणि त्यांच्या टीमने केले आहे. एवढेच नव्हे, तर चौगुले यांनी तयार केलेल्या या व्हॅक्युम तंत्रज्ञानासाठी पेटंटसाठी अर्जही केला आहे. त्यांच्यासोबत स्वयंसेवकांची एक प्रशिक्षित टीमदेखील कार्यरत आहे.

Kolhapur Bee Rescue
Kolhapur : कामासाठी हव्यात ‘आशा’... मानधनासाठी पदरी ‘निराशा’

मधमाश्या शहरात का येतात?

शहरीकरणामुळे जंगलातील पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. सिमेंटच्या इमारती थंड असतात आणि सुरक्षित वाटतात. पाण्याचा सुलभ स्रोत, शांत परिसर आणि उंचीमुळे शहरातील काही ठिकाणे त्यांना पोळी बांधण्यासाठी योग्य वाटतात.

आग्या मोहोळविषयी

या माशीचे शास्त्रीय नाव अळिी वेीीरींर. सामान्यपणे या माशीला खपवळरप ठेलज्ञ इशश आग्या मोहोळ (मराठीत) असे म्हणतात. माश्या मोठ्या आकाराच्या असतात. एका माशीची लांबी सुमारे 2-3 सें.मी. पर्यंत असते. ही माशी अत्यंत सावध असून आणि आक्रमक स्वभाव असतो. पोळ्याला त्रास दिल्यास झुंडीने हल्ला करतात. एका पोळ्यात सुमारे 50,000 ते 1,00,000 मधमाश्या असतात.

* कोल्हापुरातील 50 पेक्षा अधिक मधमाश्यांची पोळी जंगलात हलवली

* कोल्हापुरात विकसित झाले पर्यावरणपूरक स्थलांतर तंत्र

मधमाश्यांच्या संरक्षणाबाबत कायदा काय सांगतो?

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार मधमाश्या अन्य किटक गटात मोडतात. त्यांना जाळून किंवा कीटकनाशक टाकून मारण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. मधमाश्यांचे पोळे जाळणे किंवा कीटकनाशक टाकणे दंडनीय आहे.

दिनकर चौगुले, पर्यावरण कार्यकर्ता

मधमाश्या वाचवण्याच्या उपाययोजना स्थानिक प्रशासनाने अधिकृत धोरणात समाविष्ट केल्या, तर मधमाश्यांचे संरक्षण करता येईल. आपण आपल्या परिसरात मधमाश्याचे पोळे पाहिलेत, तर कृपया ते जाळू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news