गुडाळ : पुढारी वृत्तसेवा : राधानगरी आगारातील ४५ पैकी तब्बल २५ बसेस मुंबई- कोकणातील चाकरमान्यांना सोडण्यासाठी शनिवारी मुंबईला रवाना केल्या आहेत. यामुळे आज रविवारी (दि.१७) रोजी राधानगरीतील प्रवासी वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
दरम्यान, या बसेस मंगळवारीनंतर आगारात दाखल होणार असल्याने आणि वडापच्या गाड्याही जवळपास बंदच असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. राधानगरी आगारात आता २० बसेस प्रवाशांच्या सेवेत राहिल्या आहेत. त्यापैकी ६ बसेस राधानगरी- मुंबई या मार्गावर ये -जा करीत आहेत. तर ५ बसेस राधानगरी- पुणे मार्गावर धावत आहेत. त्यामुळे उर्वरित अवघ्या ९ बसेस तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी उरल्या आहेत.
परिणामी अनेक मुक्कामाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक मार्गांवर प्रवाशांची संख्या मोठी असूनही बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशी बस थांब्यावर ताटकळात उभा असल्याचे चित्र सकाळपासून दिसत आहे. तरी नोकरीनिमित्त ये -जा करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना रविवारी सुट्टी होती. सोमवारी -मंगळवारी उपलब्ध बसेसवरील प्रवाशांचा ताण पुन्हा वाढणार आहे.
हेही वाचा :