Dr Sunilkumar Lavate Award | डॉ. सुनीलकुमार लवटे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान जाहीर

Sunilkumar Lavte
सुनीलकुमार लवटे File Photo
Published on
Updated on

पुणे : ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सुनीलकुमार लवटे यांना जाहीर झाला आहे.

दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून गेली ४८ वर्षे श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या गदिमा प्रतिष्ठानचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्राचार्य भोसले यांच्या जयंतीदिनी १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या समारंभात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्य भोसले यांना विलक्षण आदर होता. डॉ. लवटे यांनी गेली पाच दशके लेखनातून आणि व्याख्यानातून जागर केला. या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे. श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गदिमा प्रतिष्ठानचा सन्मान करण्‍यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news