Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिता जाधव यांची ताराराणी विद्यापीठाला भेट; प्राध्यापक आणि पदवीधरांशी साधला संवाद

Pune Graduate Teachers Constituency Election : 'ताराराणी विद्यापीठ स्त्रीशिक्षणाचा दीपस्तंभ'
Dr. Smita Jadhav
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ‘छत्रपती ताराराणींच्या नावाने उभ्या राहिलेल्या ताराराणी विद्यापीठाने कमला कॉलेजच्या माध्यमातून पिढ्यान्‌पिढ्या लाखो विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत. स्त्रीशिक्षणाचा आणि सक्षमीकरणाचा हा ऐतिहासिक वारसा पाहताना एक महिला आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत घटक म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो,’ असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी केले. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी ताराराणी विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या भेटीदरम्यान डॉ. स्मिता जाधव यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि पदवीधर मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. उच्च शिक्षण क्षेत्रातील नवी आव्हाने, प्राध्यापकांच्या प्रलंबित समस्या, पदवीधर तरुणींसाठी रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षांमधील मुलींचा टक्का वाढवणे या मुद्द्यांवर बैठकीत सखोल व सकारात्मक चर्चा झाली. उच्च शिक्षणातील प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडून ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. जाधव यांनी या वेळी सांगितले.

या प्रसंगी कमला कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. क्रांतीकुमार पाटील, सचिव श्री. प्राजक्त पाटील, प्रा. तेजस्विनी मुडेकर, पदवीधर मित्र संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील चुयेकर, डॉ. सुजय पाटील, प्रा. विश्वनाथ तराळ, प्रा. रंगापुरे यांच्यासह भाजप कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना पदाधिकारी दुर्गेश लिंग्रज, विराज चिखलीकर आणि अमर साठे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news