Panjabrao Deshmukh award | डॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई : राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार स्वीकारताना डॉ. संजय डी. पाटील व सौ. वैजयंती संजय पाटील. सोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे -पाटील आदी.
मुंबई : राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार स्वीकारताना डॉ. संजय डी. पाटील व सौ. वैजयंती संजय पाटील. सोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे -पाटील आदी.
Published on
Updated on

मुंबई : कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्‍य शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न’ पुरस्कारने राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पत्नी सौ. वैजयंती पाटील यांच्या समवेत डॉ. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कृषी विभागामार्फत राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण बुधवारी कृषी दिनी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईल, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे , कृषी संचालक रफिक नायकवडी उपस्थित होते. यावेळी कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२३ ने डॉ. संजय डी. पाटील, तर २०२४ साठी यज्ञेश सावे यांना सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांनी इतरांसाठी दिशादर्शन, मार्गदर्शन करावे.

यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, आ. सतेज पाटील, सौ. सुप्रिया चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, सौ राजश्री काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, सौ. स्नेहा तेजस पाटील, देवश्री पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ. महादेव नरके, डी. एन. शेलार, अमोल गाताडे, पी. डी. उके, जयवंत जगताप आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्‍याकडून कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. पाटील यांनी कृषी, फलोत्पादन, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना बळ देऊन शेतीत आधुनिकता आणली. शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी अखंडपणे ते कार्यरत आहेत. तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य उभारल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news