Kolhapur Crime : गर्भलिंग रॅकेटला सोनोग्राफी मशिन पुरवणारा डॉक्टर अटकेत

करवीर पोलिसांची इचलकरंजीत कारवाई
Kolhapur Crime News
गर्भलिंग रॅकेटला सोनोग्राफी मशिन पुरवणारा डॉक्टर अटकेत
Published on
Updated on

कोल्हापूर : भोगावती कारखान्याच्या क्वॉटर्समध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रास सोनोग्राफी मशिन पुरविणाऱ्या इचलकरंजी येथील होमिओपॅथी डॉक्टरला करवीर पोलिसांनी अटक केली. शिवप्रसाद सत्याप्पा महादेव - पाटील (वय ४०, रा. शिवगंगा अपार्टमेंट, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. दिल्ली येथील एका कंपनीकडून शिवप्रसादने स्वतःच्या नावे सोनोग्राफी मशिन खरेदी केले होते.

भोगावती साखर कारखान्याच्या क्वॉटर्समध्ये सुरू असलेल्या गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी मंगळवारी (३० जून) छापा टाकला होता. यामध्ये मुख्य सूत्रधार महेश सुबराव पाटील, श्रीमंत तानाजी पाटील, अनिल प्रकाश टिपुगडे, सुनील प्रकाश पाटील, विजय कोळसकर यांना अटक केली होती. यामध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या होत्या.

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सोनोग्राफी मशिनबाबत सखोल तपास केला असता, हे मशिन इचलकरंजी येथील शिवप्रसाद महादेव-पाटील याने हे मशिन खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली. यानुसार बुधवारी (दि. २९) रात्री इचलकरंजी येथील दवाखान्यातून शिवप्रसादला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने स्वतःच्या नावाने हे मशिन दीड लाखाला खरेदी केल्याची कबुली दिली.

म्होरके महेश पाटील, स्वप्निल पाटील आणी शिवप्रसाद पाटील यांची गेल्या १० वर्षांपासून मैत्री होती. शिवप्रसादने २०२४ मध्ये हे सोनोग्राफी मशिन दीड लाख रुपयांना खरेदी केले होते. त्याची विक्री तीन लाखांना महेश पाटीलला केली हाेती.

होमिओपॅथी डॉक्टर अन् मशिनची मागणी

गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी मशिन हे केवळ स्त्री रोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांनाच त्यांची पदवी पाहून दिले जाते. मात्र शिवप्रसादने बॅचलर ऑफ होमिओपॅथी अँड सर्जरीची पदवी घेतली होती. या पदवीने सोनोग्राफी मशिन खरेदी करण्याची कायद्याने बंदी आहे. मात्र तरीही शिवप्रसादने हे मशिन खरेदी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news