Illegal Abortions Case| हजारो रुपये पेन्शन, तरीही पैशांचा हव्यास; निष्पाप जीवांचा केला सौदा

डॉक्टरकीच्या पेशालाच फासला काळिमा
Illegal Abortions Case|
Illegal Abortions Case| हजारो रुपये पेन्शन, तरीही पैशांचा हव्यास; निष्पाप जीवांचा केला सौदाFile Photo
Published on
Updated on

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : राज्याच्या विविध जिल्ह्यांत सिव्हिल सर्जन... कोल्हापुरातील काही तालुक्यांमध्ये चीफ मेडिकल ऑफिसरपद तसेच पुण्यातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सहायक संचालक म्हणून काम... निवृत्तीनंतर दरमहा ७०-८० हजारांची पेन्शन, तरीही पैशांच्या हव्यासापोटी डॉक्टरच कसाई बनला. एक-दोन नव्हे तर २५० हून अधिक गर्भपात करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गायकवाड याने डाॅक्टरकीच्या पेशालाच काळिमा फासत निष्पाप जीवांचा सौदा केला.

दुमजली घर, चार खोल्यांचे रुग्णालय

डॉ. गायकवाड याने १९८३ ते ९५ या काळात गांधीनगर, सोळांकूर, हातकणंगले येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून तर बढती; नंतर पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम पाहिले आहे. तर पुणे येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक, सहायक संचालक म्हणून सेवा बजावली आहे. निवृत्तीनंतर कोल्हापुरातील कदमवाडी परिसरात दोनमजली घर घेऊन तळमजल्यावर दवाखाना थाटला होता. त्याच दवाखान्यात डॉ. चंद्रकांत गायकवाड हा २० ते ४० हजार रुपये घेऊन गर्भपात करत होता. त्याच्याकडे सापडलेले मशिनही १९९८ सालचे जुने असल्याचे समोर आले आहे.

वादग्रस्त कारकीर्द

डॉ. गायकवाड सोळांकूर येथे असताना प्रत्येक गुरुवारी सोबत सोनोग्राफी मशिन घेऊन येत असल्याच्या तक्रारी त्यावेळी झाल्या होत्या; तर मुंबई येथील जी. टी. हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित केले होते.

यांनी केली कारवाई

पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कळकुटे, पोलिस अंमलदार राहुल देसाई, विजय तळसकर, रणजित पाटील, अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news