

कबनूर : पुढारी वृत्तसेवा : कबनूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी संप व आंदोलन केल्याशिवाय दीपावली बोनस मिळत नव्हता. ग्रामपंचायतीने ही प्रथा मोडीत काढत यावर्षी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याच्या पगारा इतकी ( १६.६६ टक्के ) रक्कम दीपावलीपूर्वी अदा करण्यात आली. तसेच सप्टेंबर महिन्याचा पगारही दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दीपावली यंदा गोड झाली. ग्रामपंचायतीकडे कायम व हंगामी कर्मचारी मिळून एकूण ८० कर्मचारी आहेत. पगार व बोनस मिळून एकूण रु. ३९ लाख ६५ हजार रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करणेत आली.
सरपंच शोभा पोवार यांनी स्वागत केले. उप- सरपंच उत्तम उर्फ सुधीर पाटील यांनी प्रास्ताविकात घरफाळ्याची रक्कम भरलेल्या नागरिकांचे आभार मानले. तसेच घरफाळा वसुली केलेल्या लिपिकांनी वसुलीत सातत्य ठेवावे, असे सांगून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव व सुभाष पोवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रा. पं. सदस्य सैफ मुजावर यानी आभार मानले.
हेही वाचा