कोल्हापूर : खा. धनंजय महाडिक भाजपचे स्टार प्रचारक

खा. धनंजय महाडिक
खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. आघाडी आणि महायुतीने प्रचार यंत्रणा सक्रिय केल्या आहेत. (Lok Sabha Elections 2024)

भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. चाळीस स्टार प्रचारकांच्या यादीत खा. महाडिक यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. (Lok Sabha Elections 2024)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news