Devendra Fadnavis : कागल पालिकेने उभारलेल्या धबधब्याचे लोकार्पण, रिसॉर्टचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

कागल नगरपालिकेच्या विकासकामांना मिळणार नवी ओळख
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis(Pudhari Photo)
Published on
Updated on

कागल : कागल नगरपालिकेने उभारलेल्या पाझर तलाव पर्यटन केंद्राची भुरळ खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडली असून, ते रविवारी (दि. 15) सायंकाळी सात वाजता या पर्यटन केंद्राला भेट देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विनंतीनुसार पाझर तलाव पर्यटन प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.

तयारीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी शनिवारी दुपारी पर्यटन केंद्राला भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चार कोटी रुपये खर्चाच्या नव्या रिसॉर्टचे भूमिपूजन व कासवाच्या आकारातील धबधब्याचे लोकार्पणही होणार आहे. या भेटीमुळे कागल नगरपालिकेच्या विकासकामांना नवी ओळख मिळणार आहे. येथे म्युझिकल फाऊंटन व लेसर शोची विशेष व्यवस्था केली आहे. 30 मीटर परिसरात पसरलेल्या 45 चेसिंग जेटस्‌‍द्वारे आकर्षक लाईट इफेक्टस्‌‍ तयार केले जातात. मध्यभागी लेसर स्क्रीनवर विविध चित्रफिती दाखवण्यात येतात.

पाझर तलावात आवाजाच्या तीवतेनुसार नियंत्रित होणारा व्हॉईस फाऊंटन सुरू करण्यात आला असून, सुमारे 150 फूट उंचीपर्यंत उडणारा हा कारंजा विशेष आकर्षण ठरत आहे. बारा महिने सुरू राहणारा कृत्रिम धबधबा, गोव्यातील धर्तीवर बोटिंग राईडस्‌‍, पाण्याचे रिसायकलिंग, स्वच्छ पदपथ, ‌‘गोवा बीच‌’ संकल्पना, लहान मुलांसाठी साहसी खेळ तसेच ऑक्सिजन पार्कमधील विविध झाडे अशा अनेक सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. 25 फूट उंच कासवाच्या तोंडातून धबधब्यात कोसळणारे पाणी, 40 एलईडी लाईटस्‌‍, 300 नोजल्समधून उडणारे कारंजे आणि 600 वॅटच्या म्युझिकल सिस्टीममुळे हा परिसर पर्यटकांसाठी नेत्रदीपक ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news