

Datta Jayanti Pudhari newspaper special supplement
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त जयंती महोत्सवानिमित्त 'दै. पुढारी' ने प्रसिद्ध केलेल्या दत्त जयंती विशेष पुरवणीचे नृसिंहवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, तसेच दै. 'पुढारी'चे नृसिंहवाडी प्रतिनिधी दर्शन वडेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर म्हणाले, "दै . पुढारी'ने दत्त जयंती निमित्त प्रसिद्ध केलेली ही पुरवणी खरोखरच संग्राह्य आहे. नृसिंहवाडीच्या माहात्म्यावरील विशेष लेख अत्यंत वाचनीय असून ते भक्तांसाठी माहितीपूर्ण ठरतील. पुढारीने नेहमीच भाविकांच्या हितासाठी महत्त्वाच्या बातम्या आणि आवश्यक सूचना अधिक प्रभावीपणे प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यामुळे प्रशासकीय सूचना अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
तहसीलदार हेळकर यांनी यावेळी प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीच्या प्रचंड गर्दीचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण तालुका प्रशासन तळ ठोकून कार्यरत आहे. यावेळी गर्दीचे नियोजन, पार्किंग व्यवस्था, तसेच आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था उत्कृष्टरित्या करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी 'दै. 'पुढारी' च्या विशेष प्रयत्नाबद्दल अभिनंदन केले आणि पुरवणीतील लेखाचे विशेष कौतुक केले.