MPSC PSI Result: दानोळीचा अभिजित केणे पीएसआय परीक्षेत राज्यात सातवा

MPSC PSI Result: दानोळीचा अभिजित केणे पीएसआय परीक्षेत राज्यात सातवा
Published on
Updated on

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : येथील धरणग्रस्त वसाहत आदर्श गाव दानोळी येथील शेतकरी कुटुंबातील अभिजित विलास केणे याने अतिशय कष्टातून राज्यात सातवा क्रमांक पटकावत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभिजितचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर धरणग्रस्त वसाहत, आदर्शगाव, दानोळी येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर येथे झाले. तर, महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे झाले. या यशात आई, वडील, मोठा भाऊ यांची प्रेरणा तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे धनाजी केणे, रणजित केणे यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे अभिजितने सांगितले.
दरम्यान, ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण केली. दरम्यान ग्रा.प. सदस्या मंगल दळवी यांनी अभिजीतचा सत्कार केला. यावेळी महेश दळवी, विजय दळवी, सुरेश पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news