किणी: पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील किणी येथील आफ्रिन मेहबूब बिजली हिची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या किणी येथील कन्या विद्यामंदिर येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात झाले. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी प्राप्त केली.
सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या आफ्रिन हिने अतिशय जिद्दीने अभ्यास करत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. तिला तिचे चुलते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, वडील मेहबूब बिजली, आई शिरीन बिजली यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तिच्या निवडीनंतर किणी येथे तिची सवाद्य मिरवणूक काढून अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा