डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठास नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठास नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे 'ए प्लस' मानांकन जाहीर झाल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी शानदार कार्यक्रमात केली. नॅककडून विद्यापीठाला 3.48 सीजीपीए गुण मिळाले आहेत. या श्रेणीमुळे विद्यापीठाच्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे डॉ. पाटील त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, आयक्यूएसी समन्वयक डॉ. राकेशकुमार शर्मा उपस्थित होते.

नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडेशन कौन्सिलच्या (नॅक) टीमने 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाकडून पुरवल्या जाणार्‍या सर्व सोयी-सुविधा, व्यवस्था, रचना, परीक्षा निकाल, अभ्यासक्रम, कॅम्पस प्लेसमेंट, प्राध्यापकांची संख्या, दर्जा यांची पाहणी केली. त्यानुसार हे मानांकन जाहीर केले आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व सहकार्‍यांच्या अथक प्रयत्नातून विद्यापीठाला 'ए प्लस' मानांकन मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहोत. दोन वर्षांनंतर पुन्हा 'ए प्लस प्लस' मानांकन मिळविण्यासाठी अर्ज करू.

आ. सतेज पाटील म्हणाले, 'ए प्लस' मानांकन अधिक चांगले काम करायला प्रेरित करणारे आहे. यामुळे नवीन कोर्सेस सुरू करण्यास व संशोधनास चालना मिळणार आहे. सध्या 3 हजार असणारी विद्यार्थी संख्या 10 हजारांपर्यंत होण्यासाठी प्रयत्न केले जातील. कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल म्हणाले, उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन विद्यापीठ व सर्व सहकारी कार्यरत आहेत. यावेळी संस्थेच्या विश्वस्त वैजयंती संजय पाटील, राजश्री काकडे, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, करण काकडे, डॉ. के. प्रथापन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. अभय जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. आशालता पाटील, डॉ. सी. डी. लोखंडे, जानकी शिंदे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, रुधीर बार्देसकर, डॉ. अजित पाटील आदी उपस्थित होते. डॉ. शिंपा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांनी केले. डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news