kolhapur | दुर्मीळ ‘क्रेस्टेड ट्री स्विफ्ट’चे भुदरगडमध्ये यशस्वी प्रजनन

जैवविविधतेत नव्या पाहुण्याची भर; वेगाने उडणारे तुरेवाले पक्षी
Crested Tree Swift
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात आढळलेली दुर्मीळ आणि वेगाने उडणार्‍या तुरेवाली झाडपाकोळी (क्रिस्टेड ट्री स्वीफ्ट) पक्ष्याची जोडी.
Published on
Updated on

कोल्हापूर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भुदरगड तालुक्याच्या जैवविविधतेत आता एका नव्या पाहुण्याची भर पडली आहे. अत्यंत दुर्मीळ आणि वेगाने उडणार्‍या तुरेवाली झाडपाकोळी (क्रिस्टेड ट्री स्वीफ्ट) या पक्ष्याने तालुक्यात अत्यंत प्रतिकुल परिस्थतीत केवळ घरटेच बांधले नाही, तर यशस्वीरीत्या पिलाला जन्म देऊन त्याला मोठे केल्याची पहिली नोंद झाली आहे. वन्यजीव अभ्यासक आणि पक्षीप्रेमी अमोल शिरोडकर यांनी ही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

क्रेस्टेड ट्री-स्विफ्ट हा पक्षी त्याच्या विशिष्ट तुर्‍यासाठी आणि वेगासाठी ओळखला जातो. या पक्ष्याचे घरटे हे जगातील सर्वात लहान आणि वैशिष्ट्यपूर्ण घरट्यांपैकी एक मानले जाते. झाडाच्या अगदी बारीक फांदीला चिकटवलेले, झाडाच्या सालीसारखे दिसणारे हे घरटे दुरून ओळखणे अत्यंत कठीण असते. मादी यामध्ये केवळ एकच अंडे घालते. गेल्या काही दिवसांपासून अमोल शिरोडकर या पक्ष्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. भुदरगड तालुक्यात या पक्ष्याच्या यशस्वी प्रजननाची ही पहिलीच नोंद असल्याचे सांगण्यात आले. सहसा घनदाट जंगलात आढळणारा हा पक्षी मानवी हस्तक्षेप कमी असलेल्या भागात विणीसाठी येतो. भुदरगड तालुक्यातील ही नोंद पक्षीशास्त्राच्या द़ृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, या शोधामुळे निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news