kolhapur | एकल मातांच्या पाठीशी ‘चंद्रकांत पाटील सहाय्यता कक्षाचा’चा आधार

शिक्षणासाठी १० हजार मदत; औषधांवर ५० टक्के सवलत
कोल्हापूर : ‘चंद्रकांत पाटील सहाय्यता कक्षा’तर्फे एकल माता व मुलांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
कोल्हापूर : ‘चंद्रकांत पाटील सहाय्यता कक्षा’तर्फे एकल माता व मुलांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
Updated on

कोल्हापूर : पती निधनानंतर खंबीरपणे कुटुंबाची जबाबदारी पेलत मुलांचे भविष्य घडविणाऱ्या एकल मातांच्या पाठीशी चंद्रकांत पाटील सहाय्यता कक्ष भक्कम आधार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात १४५ एकल मातांची नोंद आहे. अधिक नोंदणीसाठी सर्वेक्षण व फॉर्म भरण्यात येत आहे.

महाराष्ट्र हौसिंग सोसायटी येथे झालेल्या संमेलनात एकल माता व पाल्यांना भेटवस्तू दिल्या. पाल्यांच्या शिक्षणासाठी १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तर औषधांवर ५० टक्के सवलत मिळते. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एकल माता जिद्दीने आपल्या मुलांचा संसार आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. तुम्ही एकट्या म्हणून जो संसार चालवत आहात, त्याला थोडासा हातभार लागावा आणि तुमच्या मुलांच्या भविष्याला आधार मिळावा, या भावनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. एका सणापुरती किंवा एकदाच मदत न करता प्रत्येक सणाला भेटवस्तू देऊ!

या उपक्रमाची दखल राज्य शासनानेही घेतली आहे. राज्यातील सुमारे ४६ लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पालकांची व कुटुंबांचीही काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केल्याचे सांगितले. ‘तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ हा संदेश देत एकल माता आणि त्यांच्या पाल्यांना सातत्यपूर्ण आधार देण्याचा संकल्प सहाय्यता कक्षाने केला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सौम्या तिरोडकर, जुही कुलकर्णी, वृंदा सलगर, शिवाली निंबाळकर, विजय जाधव, राहुल चिकोडे, अंजली घोरपडे उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news