Keshavrao Bhosale Theatre : आगीचे कारण अस्पष्टच

पोलिसांनी सखोल तपास करावा; नाट्यगृह आगीच्या चौकशीचा अहवाल सादर
Keshavrao Bhosle auditorium fire
केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे कारण अस्पष्टच.Pudhari Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे कारण नऊ दिवसांच्या चौकशीनंतरही अस्पष्टच राहिले आहे. याप्रकरणी चौकशी करणार्‍या चारसदस्यीय समितीने सोमवारी आपला अहवाल आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना सादर केला. या अहवालात नाट्यगृहाला आग नेमकी कशी लागली, हे समजू शकले नसल्याचे स्पष्ट केले असून याप्रकरणी पोलिसांकडूनच सखोल तपास करावा, अशी सूचना केल्याचे समजते. यामुळे नाट्यगृहाला आग कशी लागली, ती लागली की कोणी लावली, या सर्वांची उत्तरे पोलिसांनी तपास केला तर समजण्याची शक्यता आहे.

Keshavrao Bhosle auditorium fire
केशवराव भोसले नाट्यगृहासाठी अतिरिक्त निधी : उपमुख्यमंत्री पवार

कोल्हापूरची अस्मिता, सांस्कृतिक वारसाचा अनमोल ठेवा असलेल्या, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी भीषण आग लागली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 ऑगस्ट रोजी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे आणि मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे अशी चारसदस्यीय समितीची तत्काळ स्थापन केली. आग लागलेल्या दुसर्‍याच दिवशी महावितरणच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून ही आग शॉर्टसर्किटने लागली नसल्याचेच जवळपास स्पष्ट केले होते. यामुळे आगीच्या प्रमुख कारणापैकी एक कारण नसल्याने अन्य कारणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान समितीपुढे होते.

Keshavrao Bhosle auditorium fire
Keshavrao Bhosle Theater | केशवराव भोसले नाट्यगृहाची अजित पवारांकडून पाहणी

चारसदस्यीय चौकशी समितीने 10 ऑगस्टपासून चौकशीला सुरू केली. समितीने नाट्यगृहाला प्रथम आग ज्या बाजूने लागली, त्या कुस्ती मैदानाच्या आखाड्यासमोरील स्टेजपासून माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली. जळालेले अवशेष, घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यात आली. विविध उपकरणे, यंत्रणा, शिल्लक राहिलेले साहित्य आदींचीही पाहणी यावेळी करण्यात आली. पाहणी दरम्यान काही आक्षेपार्ह वस्तू आढळतात का, याचाही शोध घेण्यात आला. नाट्यगृहापर्यंत आग कशी आली, कोणत्या भागात प्रथम लागली, त्यानंतर ती कशी कशी पसरत गेली, आगीची तीव्रता नेमक्या कोणत्या भागात वाढली, कशामुळे वाढली आदींबाबतही यावेळी समितीने माहिती घेतली. समितीने विद्युत विभाग, कामगार विभागातूनही माहिती घेतली. आग लागण्यापूर्वीच्या नाट्यगृहाच्या परिसरातील सर्व घटनांचीही माहिती घेण्यात आली. कोणकोण कामावर होते, कोण कुठे होते, त्यांना काही आक्षेपार्ह, संशयास्पद आढळून आले होते का आदीची माहिती घेण्यात आली. नाट्यगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा सीडीआरही तपासण्यात आला. मात्र या सर्वांतून चौकशी समितीच्या हाती काही लागले नाही. समितीने आगीचे कारण स्पष्ट होत नसल्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला. याबरोबर समितीने याप्रकरणी सखोल पोलिस तपास व्हावा, अशी सूचनाही केली आहे. दरम्यान अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही.

Keshavrao Bhosle auditorium fire
केशवराव भोसले नाट्यगृह वर्षभरात उभारणार

अनेक प्रश्न अनुत्तरितच

केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीने संपूर्ण कोल्हापूर हळहळले. ही आग कशी लागली, आगीचे नेमके कारण काय, हा अपघात होता की घात होता, यामागे काही षढयंत्र तर नाही ना, यामागे कोणाचा हलगर्जीपणा तरी कारणीभूत ठरलेला नाही ना, असे आगीबाबतचे अनेक प्रश्न कोल्हापूरकरांच्या मनात आहेत. चौकशी समितीतून यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी शक्यता होती. मात्र, नाट्यगृहाच्या आगीबाबतचे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरितच राहिले आहेत.

Keshavrao Bhosle auditorium fire
केशवराव भोसले नाट्यगृह आगीची चौकशी : मुख्यमंत्री

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

या आगीच्या कारणांचा शोध घेणार्‍या समितीने अहवाल सादर केल्याची माहिती आहे. मात्र, महापालिकेकडून अद्याप तसे जाहीर करण्यात आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी होत आहे. मात्र, अद्यापही तसा गुन्हा नोंद झालेला नाही. यामुळे यापुढे याबाबत महापालिका काय भूमिका घेणार, याकडे कोल्हापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Keshavrao Bhosle auditorium fire
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन:उभाणीसाठी शाहू ग्रुपची १० लाखांची मदत

स्ट्रक्चरल ऑडिट सुरू मुंबईतील तज्ज्ञ कोल्हापुरात

कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नवी मुंबई येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंटचे तज्ज्ञ कोल्हापुरात आले असून सोमवारी त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू केले आहे. नाट्यगृहाला आग लागल्यानंतर आत जळालेले मटेरियल, राखेचे ढीग पडले असून हे ढीग बाहेर काढल्यानंतर इंडोस्कोप इन्स्पेक्शन मशिनद्वारे पुढील काम होणार आहे.

Keshavrao Bhosle auditorium fire
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुन:उभाणीसाठी शाहू ग्रुपची १० लाखांची मदत

केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवार, दि. 8 ऑगस्ट रोजी आग लागली. यामध्ये नाट्यगृह बेचिराख झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हा ठेवा कोल्हापूरकरांसाठी निर्माण केला होता. पण हा ठेवा जपू शकलो नसल्याची भावना कोल्हापूरकरांच्यात निर्माण झाली. त्यामुळे जळालेले ‘केशवराव’ जसेच्या तसे उभा करण्याचा संकल्प करण्यात आला. सर्वच क्षेत्रातील मंडळी पुढे आली. शासनाने नाट्यगृहासाठी 20 कोटी निधी जाहीर केला. महापालिकेने यासंदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये नवी मुंबई येथील स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंटची निविदा निश्चित करण्यात आली. या कंपनीला हेरिटेज इमारतींची कामे करण्याचा अनुभव आहे. कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर जयंत कदम, राजेश घोरपडे, ऋषीकेश सोनावणे हे सोमवारी कोल्हापुरात आले. त्यांनी पहिल्या टप्यात पाहणी करून काही निरीक्षणे नोंदविली. मंगळवारी टेक्निकल डायरेक्टर सुनील पोवार हेही येणार असून इंडोस्कोप इन्स्पेक्शन केले जाणार आहे. या पथकासोबत महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे अभियंते उपस्थित राहणार आहेत.

Keshavrao Bhosle auditorium fire
केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटनेबाबत महावितरणचा खुलासा

अनुभवी कंपनी

हेरिटेज वास्तूंचे ऑडिट करणे, पुनर्बांधणी करणे आदी कामे ही कंपनी करत असून अशा प्रकारच्या कामामध्ये कंपनीचा दबदबा आहे. मुंबईतील ताज हॉटेल, व्ही. टी. स्टेशन आदींच्या पुनर्बांधणीचे काम कंपनीने केले आहेे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news