Keshavrao Bhosale  Natyagruha Kolhapur
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटनेबाबत महावितरणने खुलासा केला आहे. File Photo

केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटनेबाबत महावितरणचा खुलासा

Keshavrao Bhosale Natyagruha Kolhapur | आगीच्या घटनेशी कोणताही संबंध नाही
Published on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मानदंड असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत भस्मसात झाले. या दुर्घटनेबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या दुर्घटनेबाबत महावितरणने मोठा खुलासा केला आहे. (Keshavrao Bhosale Natyagruha Kolhapur)

महापालिकेच्या नावाने महावितरणकडून वीज जोडणी

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे कोल्हापूर महापालिकेच्या नावाने महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली आहे. महावितरणचा हा एक उच्चदाब ग्राहक आहे. नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा (CT- PT, रोहित्र व मीटरींग युनिट) ही नाट्यगृहाच्या इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत सुमारे १०० फूट अंतरावर आहे. (Keshavrao Bhosale Natyagruha Kolhapur)

नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी सर्व यंत्रणा सुस्थितीत

महावितरणची जबाबदारी ही मीटरींग युनिट पर्यंत असते. तेथून पुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते. तसेच नाट्य गृहातील अंतर्गत वीज वितरण व्यवस्था ही महानगरपालिकेकडून पाहिली जाते. सद्यस्थितीत नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची सर्व यंत्रणा सुस्थितीत आहे. त्यामुळे संबंधित आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. (Keshavrao Bhosale Natyagruha Kolhapur)

Keshavrao Bhosale  Natyagruha Kolhapur
Keshavrao Bhosale Theatre : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news