Ayodhya Temple donation theft case | आरोपींच्या घरात सापडले नोटांचे बंडल

Ayodhya Temple donation theft case |
Ayodhya Temple donation theft case | आरोपींच्या घरात सापडले नोटांचे बंडल
Published on
Updated on

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्या श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या घरांच्या झडतीदरम्यान पोलिसांना नोटांचे बंडल आणि सोन्याचे दागिने (कानातील बाळ्या, लॉकेट) सापडले आहेत. एक कारही जप्त करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या आरोपीच्या घरातून किती रोकड आणि सामान जप्त करण्यात आले, याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही.

आरोपी अनुकल्प मिश्रा याच्या घरी पोलिसांनी झडती घेतली. त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली. अनुकल्पने चौकशीदरम्यान सांगितले की, मी आणि अविनाश शुक्ला चोरीचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचो. तसेच, लोकांना ते पैसे व्याजाने द्यायचो. आम्ही हे पैसे आधी आमच्या जवळच्या लोकांना आणि नातेवाईकांना द्यायचो आणि नंतर त्यांच्याकडून आमच्या खात्यात ट्रान्‍स्‍फर करून घ्यायचो.

राम मंदिर चोरीतील २०० कोटी कर्नाटकात

राम मंदिरातील देणगी चोरीतील २०० कोटी रुपये कर्नाटकात आले असल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केला असतानाच, आता मुख्यमंत्र्यांन दुसरा बॉम्ब टाकला आहे. १९९१ साली कर्नाटकातून राम मंदिरासाठी जमवलेली देणगी राम मंदिर ट्रस्टकडे पोचलेलीच नाही, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. आम्ही खबरदारी म्हणून धर्मादाय खात्याच्या अखत्यारीतील सगळ्याच मंदिरांमध्ये सीसीटीव्ही सक्तीची केली आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news