केबल वॉर; ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला

केबल वॉर; ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला

कोल्हापूर : केबल वादातून धारदार खंजिराने केलेल्या हल्ल्यात सुहास शांताराम बागम (वय 34, रा. जरगनगर, कोल्हापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. उद्यमनगर परिसरात मदनलाल धिंग्रा मंडळासमोरील चौकात शनिवारी सकाळी ही घटना घडली. जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी संजय मधुकर गायकवाड (वय 35, रा. उद्यमनगर) याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयित पसार झाला आहे. हल्ल्यात तरुणाच्या डाव्या हाताला तसेच पाठीवर जखमा झाल्या आहेत. हल्ल्याची माहिती समजताच समर्थक ऑपरेटरर्सनी रुग्णालयात गर्दी केल्याने काही काळ तणाव होता.

व्यावसायिक स्पर्धेतून ग्राहकांना प्रतिस्पर्धी केबल नेटवर्कची चुकीची माहिती पुरविल्याच्या कारणातून संशयित ऑपरेटर गायकवाडने उद्यमनगर परिसरात भर चौकात बागम याची मोटार रोखली. संशयिताने त्याला मोटारीतून खाली उतरण्यास सांगितले. जुनी केबल बदलून टाका, असे ग्राहकांना का सांगतोस, असा जाब विचारत त्याच्याशी वाद घातला.

केबल वॉरमधून संघर्ष चव्हाट्यावर

दोघात वादावादी सुरू असतानाच गायकवाडने धारदार खंजिरने बागम याच्यावर हल्ला केला. शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात पुन्हा केबल वॉर सुरू झाले असून प्रतिस्पर्धी व्यावसायिक, ऑपरेटर यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news