CPR Blood Bank | ‘सीपीआर’ ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा

केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा : डॉक्टर, कर्मचार्‍यांनी केले रक्तदान
CPR Blood Bank |
CPR Blood Bank | ‘सीपीआर’ ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यासह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि लगतच्या कर्नाटकातील गोरगरीब, मध्यमवर्गीय रुग्णांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) ब्लड बँकेत रक्ताची टंचाई आहे. रखरखत्या उन्हामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत. सामाजिक संस्था, महाविद्यालये, दानशूर व्यक्ती, पदाधिकारी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी केले आहे.

बुधावारी सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचारी रक्तदान करून रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. दोन दिवस पुरेल इतका रक्ताचा साठा शिल्लक आहे. रक्तगटांसाठी मात्र वेटिंग आहे. सीपीआरमध्ये रोज 1500 तर महिन्याला 35 ते 40 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. अतीगंभीर रुग्णांना व काही विभागातील नियमित रुग्णांना रक्तपुरवठा करावा लागतो. हृदय शस्त्रक्रिया, डायलेसिस, थॅलेसेमिया, हिमोफॅलिया, जेबीसिंन्ड्रोम, कॅन्सर, प्रसूतीगृहात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सातत्याने रक्ताची गरज भासत असते. एका रक्ताच्या बॅगेत 350 मिलीलिटर रक्त असते. अशा 1200 ते 2000 रक्त बॅग्जची गरज दर महिन्याला असते. सीपीआरमधील रुग्णांना या ब्लड बँकेतून मोफत रक्त पुरवले जाते. खासगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण रक्ताची मागणी करतात, पण मुबलक रक्त पिशव्यांची उपलब्धता असेल तरच मिळते. रक्त टंचाईमुळे प्रशासनाने रक्तदानासाठी आर्त हाक दिली आहे.

खासगी ब्लड बँकांकडून प्रलोभने

खासगी ब्लड बँकांकडून व्यावसायिक पद्धतीने काम केले जाते. रक्तदान शिबिरासाठी प्रलोभने दिली जातात. काही ब्लड बँकांकडून तर रुग्णसेवेतील तत्त्वे, मूल्ये गुंडाळून रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. त्याचा फटका सीपीआरच्या ब्लड बँकेला बसला आहे. खासगी ब्लड बँका रक्ताच्या थैलीसाठी आव्वाच्या सव्वा आकारणी करतात. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news