कोल्हापूर : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोविरोधात भाजपची निदर्शने

कोल्हापूर : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोविरोधात भाजपची निदर्शने

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी आक्षेपार्ह टीका केली होती. याच्या निषेधार्थ आज ( दि. १७ ) कोल्हापूर भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी बिलावल भुट्टोच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा व बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. पाकिस्तानच्या झेंड्याची होळी कण्यात आली. यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

यावेळी मारुती भागोजी, प्रदीप उलपे, अमोल पालोजी, संतोष भिवटे, तोफिक बागवान, प्रदीप पंडे, रवींद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, विजय खाडे पाटील, महेश यादव, नजीर देसाई, अतुल चव्हाण, माणिक पाटील-चुयेकर, हर्षांक हरलीकर, राहुल घाटगे, विजय दरवान, रमेश दिवेकर, विशाल शिराळकर, केशव तिरोडकर, राजाराम परीट, नाजीम आत्तार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news