Kolhapur Admapur Balumama| 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं'! आदमापुरात बाळुमामांची बकरी बुजवणे कार्यक्रम जयघोषात

'बाळूमामांच्या नावानं चांगभलं'! आदमापुरात बाळुमामांची बकरी बुजवणे कार्यक्रम जयघोषात
Balumama Bakri Bujavane Adamapur
आदमापूर- बाळूमामांची बकरी बुजवण्याप्रसंगी मेंढी माऊलीची केलेली पुजा
Published on: 
Updated on: 

गारगोटी (कोल्हापूर) : लाखों भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्ष्रेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा या देवस्थानचा बकरी बुजवणे कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत येथील मरगुबाई मंदिर येथे उत्साही धार्मिक वातावरणात संपन्न झाला. 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं'चा जयघोष, भंडाऱ्याच्या उधळणीत, फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिर परिसर दणाणून गेला.

मंगळवार दि.10 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा दिपावली पाडव्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळुमामा यांनी आपल्या बकऱ्यांचे पूजन अन् बुजवणे ही प्रथा सुरू केली होती. बाळूमामांच्या पश्चात त्यांच्या भक्तांनी ही प्रथा गेली अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकमधून हजारो भाविक सोमवारी रात्री उशीरापर्यंत हजर झाले. बकरी बुजवणे कार्यक्रमासाठी बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंढ्या एकत्र करून त्यांची रास केली जाते. त्या राशीच्या भोवती ऊस, कर्दळ ऊभा करून त्याची पुजा बांधली जाते. वाडा बांधला जातो. सकाळी साडेवाजता बाळूमामा देवालय समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले हस्ते ढोल- कैताळाच्या सहवाद्य मिरवणुकीने भंडारा आणला व या राशीवर उधळण करण्यात आली. मेंढी माऊलीला सजवून त्यांचे औक्षण करण्यात आले. बकरी बुजवण्यात आली.

या बकरी बुजवणे कार्यक्रमात दुध ऊतू जाण्याचा क्षण पाहण्यासाठी भाविक आतूर झालेले असतात. ज्या दिशेला दूध ऊतू जाईल, त्या दिशेला पीक, पाऊस पाणी चांगले होते, अशी मामाची भविष्यवाणी असायची. त्यामुळे या उत्सवात हा क्षण अनमोल असतो. तो टिपण्यासाठी भक्तांच्या नजरा खिळून राहतात. यावर्षी पूर्व-दक्षिण मध्यबाजूस हे दूध ऊतू गेले आहे. त्यामुळे हा भाग समृद्ध होईल, अशी आशा आहे.

Balumama Bakri Bujavane Adamapur
Kolhapur Admapur Balumama | बाळुमामाच्यां बकऱ्यांचे आदमापूर येथे आगमन, भक्तीमय वातावरणात पुजन

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, पुंडलिक होसमणी, करणसिंह भोसले देवस्थान समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Balumama Bakri Bujavane Adamapur
Balumama Bhandara Yatra | हजारो भाविकांच्या उपस्थितीत आदमापूर येथील बाळूमामा भंडारा यात्रेस प्रारंभ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.