Kolhapur Admapur Balumama | बाळुमामाच्यां बकऱ्यांचे आदमापूर येथे आगमन, भक्तीमय वातावरणात पुजन

Kolhapur Admapur Balumama goats arrival Admapur | बाळुमामाच्यां बकऱ्यांचे आदमापूर येथे आगमन, भक्तीमय वातावरणात पुजन, दीपावली पाडवा बकऱ्यांचे होणार पूजन.
Kolhapur Admapur
आदमापूर - येथे बाळुमामांच्या बकरी आगमनप्रसंगी पालखी पूजन करताना करताना सुवासिनी, ग्रामस्थ, मान्यवर (फोटो-राजू कांबळे, आदमापूर)
Published on: 
Updated on: 

मुदाळतिट्टा - महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळू मामांच्या मेंढरांचे शनिवार दि. 7 ऑक्टोंबर रोजी आदमापूर येथे आगमन झाले. ढोलक कैताळाच्या गगनभेदी आवाजात, भंडार्‍याच्या मुक्त हस्ते उधळणीत, फटाक्यांची आतिषबाजीत उत्साही भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

बाळुमामा भक्तनिवासपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाळुमामा मंदीर, हनुमान मंदिर मार्गे मरगुबाई मंदिर परिसरात हा मेंढराचे(बकर्याचा) कळप स्थिरावला. मार्गावरुन बाळुमामाची पालखी जात असताना सुहासिनींनी औक्षण केले. आंबील घुगुऱ्या, पाणी कलश घेऊन सुवासिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावर्षी नागाप्पा कारभारी यांचा बग्गा नंबर सहाची बकरी आदमापुर येथे आली आहेत.

बाळूमामा देवालय समिती व आदमापूर ग्रामस्थ, भक्त गण सेवा मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दिपावली पाडव्यादिवशी बाळूमामा यांनी सुरु केलेली लेंढी पूजन, बकरी बुजवणे ह्या कार्यक्रमाची प्रथापुढे चालू ठेवण्यासाठी ही बकरी सध्या आदमापूर येथे आली आहेत.

Kolhapur Admapur
Kolhapur Shahuwadi | शाहूवाडी तालुक्यात अपात्र ठरलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय; कागदपत्रे उशिरा मिळाल्याने मदतीपासून वंचित

महाराष्ट्र कर्नाटकामध्ये पस्तीस हजार बकरी एकोणीस ठिकाणी बकऱ्यांच्या कळपामधून फिरत आहेत. काहीजण या बकऱ्यांची विनामोबदला सेवा, राखण करत आहेत. जशी बकरी पुढे फिरत जात आहेत, तसा भाविकांचा लोंढा आदमापुर क्षेत्री वाढत आहे. मामांनी चालू केलेली लेंडी पूजनाची प्रथा आदमापुर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. निपाणी राधानगरी मार्गावर कुरुकली, सुरुपली, यमगे, शिंदेवाडी, मुरगुड, निढोरी येथे ही गाव वेशीवर या बकऱ्यांचे पुजन स्वागत करण्यात आले.

Kolhapur Admapur
Kolhapur Ambabai Kironotsav |आजपासून अंबाबाई मंदिरात चाचणी, 'या' तारखेपासून किरणोत्सव सोहळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.