Maharashtra Cooperative Election | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठली; ऐन उन्हाळ्यात रणधुमाळी सुरू होणार

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोकराव गाडे यांचे निर्देश
Maharashtra Cooperative Election
Maharashtra Cooperative ElectionPudhari
Published on
Updated on

Maharashtra State Cooperative Election Authority

आशिष ल पाटील

गुडाळ : राज्यातील बारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां दरम्यान स्थगित केलेल्या राज्यातील अ व ब वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती शासनाने मंगळवारी (दि. 24) उठविली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोकराव गाडे यांनी आज एका आदेशान्वये राज्यात स्थगित झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे. त्या टप्प्यावर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ न्यायालयीन आदेशामुळे स्थगित झालेल्या निवडणुका यामध्ये अपवाद करण्यात आलेल्या आहेत.

Maharashtra Cooperative Election
Cooperative Society Restrictions | कोल्हापूर जिल्ह्यातील तोट्यातील ३०० विकास सेवा संस्थांच्या अस्तित्वावर टांगती तलवार

दरम्यान, या शासन निर्णयामुळे गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. आठवड्याभरात गोकुळच्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत आहेत. चार मे 2026 रोजी गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत असून येत्या मे महिन्यात गोकुळ च्या 25 जागांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्राचेच नव्हे तर राज्यातील सहकारी क्षेत्राचे लक्ष लागलेल्या गोकुळची निवडणूक मुदतीत होणार का? याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष होते. येत्या दोन दिवसात सहकार निवडणूक प्राधिकरण गोकुळकडून सभासद संस्थांची यादी मागून घेईल. 4 मे 2023 ही गोकुळच्या मतदार यादीची कट ऑफ डेट असल्याने या तारखेपर्यंत सभासद असलेल्या गोकुळच्या संलग्न प्राथमिक दूध संस्था येत्या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र ठरतील. ही यादी जाहीर केल्यानंतर त्यावरील हरकती मागवून प्राधिकरण अंतिम संस्थांची यादी जाहीर करेल.

Maharashtra Cooperative Election
Pune District Central Cooperative Bank: आरबीआयच्या सुधारीत धोरणांसाठी पुणे जिल्हा बँकेचा पुढाकार

त्यानंतर या संस्थांच्या वतीने गोकुळच्या निवडणुकीत मतदान करणे, उमेदवारी करणे, सुचक होणे यासाठी संस्थेच्या वतीने प्रतिनिधी नियुक्त करण्याचे ठराव मागविण्यात येतील. लाख मोलाचे ठराव निश्चित झाल्यानंतर मतदार यादी जाहीर होईल. आणि त्यानंतर प्राधिकरणाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन एप्रिल महिन्यात गोकुळच्या निवडणुकीचा रीतसर कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news