तुकोबांच्या पालखीला बाळूमामांच्या मेंढ्यांनी घातले रिंगण

तुकोबांच्या पालखीला बाळूमामांच्या मेंढ्यांनी घातले रिंगण

मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा : टाळ मृदंगाच्या गजरात…बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय..! 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात पुणे जिल्ह्यातील पाटस येथे आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या मेंढ्यांनी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीस रिंगण घातले.

दरवर्षी संत तुकाराम महाराज यांच्या वारीतील पालखीला बाळूमामाच्या मेंढ्यांचे रिंगण घातले जाते. याही वर्षी हा सोहळा पाटस या ठिकाणी पार पडला. बग्गा नंबर 9 चे कारभारी आप्पा माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते. या रिंगण सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील बाळूमामा भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news