

Kolhapur Accident
कोल्हापूर : कोल्हापूर शहराजवळील शिंगणापूर फाटा येथे पाण्याच्या टँकरखाली सापडून फुलेवाडीतील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दत्ता रामचंद्र दिवटे (वय ८५, रा. १३५ ए, वॉर्ड पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) असे त्यांचे नाव आहे. कोल्हापूर- गगनबावडा महामार्गाच्या कामासाठी आणलेल्या टँकरखाली सदर व्यक्ती सापडला. सिमेंटच्या रस्त्यावर टँकरद्वारे पाणी मारण्याचे मारण्याचे काम सुरू होते. यादरम्यान, शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गेल्या काही दिवसांपासून शिंगणापूर फाटा या ठिकाणी रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच आता येथे एका निष्पाप व्यक्तीचाही टँकरखाली सापडून मृत्यू झाला आहे. चालकाचे लक्ष नसल्याने मागून चालत येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर टँकर गेल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे.