

कडगाव : भालेकरवाडी (ता. भुदरगड) येथील शेतकरी मारुती नारायण भालेकर (वय 45) हे शेतात नांगरणी करत असताना रोटावेटरखाली सापडून जागीच मृत्युमुखी पडले. पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची पत्नी शोभा मारुती भालेकर (वय 40) गंभीर जखमी झाल्या. गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबतची माहिती अशी, भालेकर दाम्पत्य भात लागवडीसाठी शेतात नांगरणी करत होते. यावेळी ट्रॅक्टरवरील रोटावेटर अचानक बांधावरून खाली घसरला आणि चालू असलेल्या नांग्यांमुळे मारुती भालेकर यांच्या पोटाला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी शोभा यांनी रोटावेटर उचलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या साडीचा पदर नांग्यात अडकून दोन्ही पाय गंभीररीत्या जखमी झाले. मारुती यांच्या पश्चात वृद्ध आई, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.