

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : जयसिंगपूर येथील आदिती संजय चौगुले हिने आज (दि.२२) जाहीर झालेल्या युपीएससी २०२४ च्या परीक्षेत ६३ वी रँक घेवून यश संपादन केले. गतवर्षी २०२३ च्या युपीएससी परीक्षेत ४३३ वा रँक मिळवला होता. इंडियन डिफेन्स अकौंट सर्व्हिस जॉईन केली होती. आता तिला आयएएस अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
आदितीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालू हायस्कूल जयसिंगपूर व उच्च माध्यमिक शिक्षण जनतारा ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर याठिकाणी झाले. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेवून तिने युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती.
दरम्यान, समाजशास्त्र विषयात पदवीत्र पदवी घेवून नेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये तिने ६३ वी रँक घेवून यश संपादन केले आहे. दत्त साखर कारखान्याचे चीफ इंजिनिअर संजय चौगुले यांची ती कन्या आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.