Vishalgad Encroachment : 30 अतिक्रमणे जमीनदोस्त

दोन दिवसांत शंभर अतिक्रमणे काढली
Action to remove encroachment on Vishalgad
कोल्हापूर : विशाळगडावर मंगळवारी दुसर्‍या दिवशीही अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरूच होती.Pudhari File photo
Published on
Updated on

कोल्हापूर : विशाळगडावर अतिक्रमण काढण्याची जिल्हा प्रशासनाची मोहीम मंगळवारी दुसर्‍या दिवशीही सुरूच राहिली. दिवसभरात आणखी 30 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. सोमवारपासून दोन दिवसांत शंभर अतिक्रमणे काढण्यात आली असून, उर्वरित 15 अतिक्रमणे बुधवारी काढण्यात येणार आहेत.

Action to remove encroachment on Vishalgad
Vishalgad Encroachment | विशाळगड: हल्ला झाला, पंचनामा झाला, आता भरपाईची प्रतीक्षा

विशाळगडावर रविवारी अतिक्रमणमुक्त मोहीम आयोजित केली होती. त्याला हिंसक वळण लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून गडावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी 70 अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. दुसर्‍या दिवशीही अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली.

महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे 240 कर्मचारी, मजुरांकडून अतिक्रमण काढण्याचे काम दिवसभर सुरू होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 30 अतिक्रमणे काढण्यात आली. गडावर एकूण 117 जणांची एकूण 158 अतिक्रमणे आहेत. यापैकी 43 अतिक्रमणे ही निवासी स्वरूपाची आहेत. राज्यशासनाच्या आदेशानुसार, निवासी अतिक्रमणे सप्टेंबर महिन्यापर्यंत काढली जाणार नाहीत. ही 43 अतिक्रमणे वगळून उर्वरित 115 अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई सुरू आहे. यापैकी 100 अतिक्रमणे हटवली आहेत. उर्वरित 15 अतिक्रमणे बुधवारी काढली जाणार आहेत.

Action to remove encroachment on Vishalgad
विशाळगड अतिक्रमणांवर कारवाईची धमक दाखवा; बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार

अतिक्रमणाचा ‘ढिगारा’ खाली आणणार

अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येत आहेत. मात्र, त्याचा ढिगारा गडावरच आहे. जी अतिक्रमणे काढली; त्याच्या दगड, वीट, मातीसह जो ‘ढिगारा’ असेल तो सर्व ढिगारा गडावरून खाली आणण्यात येणार आहे. सर्व 115 अतिक्रमणे काढून टाकल्यानंतर ‘ढिगारा’ खाली आणण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम काही दिवस चालणार असून, सर्व ‘ढिगारा’ गडावरून हटवल्यानंतरच ही मोहीम थांबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Action to remove encroachment on Vishalgad
विशाळगड अतिक्रमणांवर कारवाईची धमक दाखवा; बैठकीवर संभाजीराजेंचा बहिष्कार

मोहिमेच्या पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनादेश नसलेली अतिक्रमणे काढण्यात आली. सदर मोहिमेमध्ये महसूल विभागाचे 90 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागासह त्यांनी 150 मजूर उपलब्ध केले तसेच पुरातत्व, महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घेतला. पोलिस विभागाचे 250 अधिकारी कर्मचारी घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी उपस्थित होते.

Action to remove encroachment on Vishalgad
कोल्हापूर : विशाळगड परिसरात जोरदार पाऊस; भाततळी घाटात दरड कोसळली

या मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी पन्हाळा-शाहूवाडी समीर शिंगटे, उपविभागीय पोलिस अधिकारी शाहूवाडी आप्पासाहेब पवार, तहसीलदार शाहूवाडी रामलिंग चव्हाण, सहा. संचालक पुरातत्त्व विभाग विलास वहाणे, कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग चंद्रकांत आयरेकर, उपअभियंता सा. बां. विभाग धनंजय भोसले, गटविकास अधिकारी शाहूवाडी मंगेश कुचेवार यांनी आपला सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news