Kolhapur Lok Sabha : पराभूत मंडलिक समर्थकांनी हारली ८ मुंड्या, ३२ पाय आणि ५० हजारांची पैज

कोल्हापुरातील भडका ग्रुपमधील कार्यकर्त्यांच्या हटके पैजेची चर्चा
कोल्हापुरातील भडका ग्रुपमधील कार्यकर्त्यांच्या हटके पैजेची चर्चा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन: कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांच्या समर्थकांकडून पैज लावणे नवीन प्रकार नाही. परंतु, कोल्हापूरमधील शाहूपुरीत भडका ग्रुपमधील कार्यकर्त्यांच्या हटके पैजेची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने जिंकले. तर शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांचा मोठा पराभव झाला. यावर या ग्रुपमधील कार्यकर्त्य़ांनी पैज लावली होती.

शाहू छत्रपती महाराज निवडून येणार नाहीत, असे म्हणत ग्रुपमधील ८ मंडलिक समर्थकांनी पैज लावली होती. परंतु, शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून आली. त्यानंतर मंडलिक समर्थकांनी लावलेल्या पैजेनुसार बकऱ्याच्या ८ मुंड्या, ३२ पाय आणि रोख ५० हजार रुपये शाहू महाराज समर्थकांना दिले. पैज जिंकल्याच्या आनंदात समर्थकांनी बकऱ्याच्या ८ मुंड्या, ३२ पाय काठीला बांधून नाचवत जल्लोष केला.

दरम्यान, या प्रकारावर नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बकऱ्याच्या ८ मुंड्या, ३२ पाय काठीला बांधून नाचवत जल्लोष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news