हुपरीत दसऱ्यानिमित्त श्री. शिवप्रतिष्ठानची भव्य दर्शनयात्रा

शिवप्रतिष्ठानची भव्य दर्शनयात्रा
शिवप्रतिष्ठानची भव्य दर्शनयात्रा

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : दसऱ्यानिमित्त ( विजयादशमी ) येथील ग्रामदैवत श्री. अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी श्री. शिवप्रतिष्ठानच्या वतीने भव्य दर्शन सोहळा उत्साहात पार पडला. दर्शन यात्रेच्या स्वागतासाठी गावातील रस्ते रांगोळी व फुलांनी सजविण्यात आले होते. गेली दहा दिवस सुरू असलेल्या श्री. दुर्गा माता दौडची सांगता आज संपन्न झाली. तर नवरात्र उत्सवात लाखों भक्तांनी श्री. अंबाबाई मातेचे दर्शन घेतले.

संबंधित बातम्या  

शेकडो आबालवृद्ध महिला, पुरुष भगवे फेटे परिधान करुन दर्शन यात्रेत सहभागी झाले होते. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. देव, देश आणि धर्म यांच्या घोषणा देत ही दर्शन यात्रा ग्रामदैवत श्री. अंबाबाई मंदिरात आली. यावेळी पारंपरिक ढोल, ताशाचा गजर करण्यात आला. दर्शन यात्रेचा समारोप श्री. अंबाबाई मंदिरात देवीच्या आरतीने झाला.

गेली दहा दिवस श्री. दुर्गामाता दौड सुरू आहे. या दौडची सांगता आज झाली. या दर्शन यात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्त मानकरी सहभागी झाले होते. दौडचे नियोजन तालुका कार्यवाह अजित सुतार, रावसाहेब ढेंगे, अमित नरके, किरण  भिवटे, प्रकाश लोखंडे, प्रवीण वाशीकर, संदिप सिध्दनुर्ले यांच्यासह ज्या त्या भागातील युवक मोठया उपस्थित होता.

हुपरी शहरात मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर गावाहून भाविक येतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. त्यामुळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मंदिरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाले. संगीत महोत्सव ही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news