

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : 'हनी ट्रॅप' साठी सख्ख्या बहिणींचा वापर करून अडीच लाखांच्या खंडणीसाठी व्यापार्याला धमकी देणार्या टोळीला गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
हिना सनाउल्ला फकीर (वय 30, रा. शाहूपुरी), प्रतीक्षा ऊर्फ प्रिया शिरीष कुरणे (30), यासीन सनाउल्ला फकीर (शाहूपुरी), अजित संभाजी निंबाळकर (30, राजारामपुरी), श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी (35), राहुल शिवाजी पुजारी (कावळा नाका परिसर), कृणाल विजय शेंडे (राजारामपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
टोळीचा खोलीत शिरकाव!
हिना फकीर, प्रतीक्षा ऊर्फ प्रिया कुरणे यांची सोशल मीडिया, फेसबुकआधारे एका स्थानिक व्यापार्याशी ओळख झाली. कालांतराने सलगी वाढली. दि. 4 जानेवारीला दोघींनी व्यापार्याला कावळा नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. व्यापारी हॉटेलात आल्यानंतर प्लॅननुसार म्होरक्या यासीनसह अजित निंबाळकर व अन्य साथीदार हॉटेलमधील खोलीत घुसले. व्यापार्याला एका मॉलजवळ नेऊन धक्काबुक्की करण्यात आली.
दरम्यान, हनी ट्रॅपमध्ये ओढून संशयितांनी ब्लॅकमेल करून आर्थिक लूटमार केली असल्यास संबंधितांनी पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून माहिती द्यावी, संबंधितांच्या नावांबाबत गोपनीयता पाळण्यात येईल, असेही तपास अधिकारी गवळी यांनी सांगितले.