

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) प्रचाराच्या तोफा धडाधडत आहेत. 5 जानेवारीला होणार्या या उत्कंठावर्धक निवडणुकीच्या मतदानाची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. 40 ठिकाणी केंद्रांवर मतदान होईल तर 325 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गटाप्रमाणे विविध रंगांतील मतपत्रिकांची छपाई पूर्ण झाली आहे.
सर्वसाधारण गटातील सहा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरित 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेऊन आघाडी केली आहे. तर शिवसेना स्वतंत्रपणे 11 जागांवर निवडणूक लढवत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यास केलेल्या उपकारांची जाणीव नेतेमंडळीकडून केली जात आहे.दरम्यान, आठ दिवसांत होणार्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच तयारी केली जात आहे. बारा तालुक्यांत 40 केंद्रांवर मतदान होणार आहे. केंद्र निश्चिती, केंद्रावर लागणार्या सुविधा, निवडणुकीसाठी सुमारे 325 अधिकारी आणि कर्मचार्यांची नेमणूक आदी निवडणूक पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. पतपत्रिकांची छपाई पूर्ण झाली आहे. ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )
तालुकावार मतदान केंद्रे ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )
कोल्हापूर शहर, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांत प्रत्येकी दोन, शिरोळ, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी तीन, कागल, पन्हाळा, राधानगरी, हातकणंगले, करवीर तालुका प्रत्येकी चार असे मतदान केंद्र असणार आहेत.
गटवार मतपत्रिकांचा ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )