कोल्हापूर : किरकोळ वादातून चारचाकीची तोडफोड; एक जण जखमी | पुढारी

कोल्हापूर : किरकोळ वादातून चारचाकीची तोडफोड; एक जण जखमी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : किरकोळ वादातून चारचाकीची तोडफोड करण्यात आली. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास भाऊसिंगजी रोडवर हा प्रकार घडला. यामध्ये चारचाकीतील एकजण जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहे.

भाऊसिंगजी रोडवर एक चारचाकी मागे घेताना रस्त्याकडेला थांबलेल्या तरुणांशी चारचाकीतील तरुणांचा वाद झाला. या वादातून जातीवाचक शिवीगाळ झाली. यातून हा वाद वाढला. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळतात, घटनास्थळी जमाव जमला.

चारचाकीत तिघांचा जमावाशी वाद वाढतच गेल्याने, जमावाने या चारचाकीला लक्ष्य केले. मोठ्या दगडाने चारचाकीवर हल्‍ला केला. यामध्ये चारचाकीच्या सर्व काचा, दरवाजे, टप आदीसह हेडलाईट आदी भागाचा चक्‍काचूर केला. याच दरम्यान चारचाकीत बसलेला एकजण जखमी झाला.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चारचाकीची तोडफोड करून जमाव पसार झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार घेण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

Back to top button