शिरोळ : साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढ देणारा ‘दत्त’ ठरला राज्यात पहिला कारखाना | पुढारी

शिरोळ : साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढ देणारा 'दत्त' ठरला राज्यात पहिला कारखाना

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा

येथील दत्त साखर कारखान्याने साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. ही वेतन वाढ दि.1 नोव्हेंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातील दत्त कारखाना व शर्करा औद्योगिक श्रमिक संघ यांच्यात करार करण्यात आला आहे. राज्य शासन नियुक्त त्रिपक्षीय समितीने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतनवाढ लागू करणारा ‘ दत्त ‘ हा राज्यातील पहिला साखर कारखाना असल्याचे असल्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी सांगितले.

वेतनवाढ करार नुसार कायम हंगामी वेतश्रणीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी स्व.डॉ. सा.रे. पाटील यांनी कामगार व सभासद शेतकऱ्यांच्या बाबतीत ठेवलेली हिताची भूमिका चेअरमन गणपतराव पाटील यांनी सुरू ठेवली आहे. त्यामुळे साखर कामगारांच्यात आनंदाचे वातावरण आहे. देशात सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात दत्त साखरचा लौकीक आहे. कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे. असे चेअरमन पाटील यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व सर्व खाते प्रमुख, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदिप बनगे उपस्थित होते.

Back to top button