आजरा : ट्रॅव्हल्सची तवेराला धडक, आजरा येथील देवर्डेचे १० जण जखमी | पुढारी

आजरा : ट्रॅव्हल्सची तवेराला धडक, आजरा येथील देवर्डेचे १० जण जखमी

आजरा; पुढारी वृत्तसेवा

गोव्याहून पुण्याला चाललेल्या ट्रॅव्हल्सने तवेराला दिलेल्या धडकेत देवर्डे (ता. आजरा) येथील १० जण जखमी झाले आहेत.  घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आजरा आंबोली मार्गावरील वेळवट्टी पाझर तलावाजवळील लक्ष्मी ओढ्याजवळ घडली. दरम्यान ट्रॅव्हल्सचा चालक फरारी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पुणे येथील एका कपंनीतील कर्मचारी सहकुटुंब गोवा येथे पर्यटनासाठी ट्रॅव्हल्स (एमएच ०१ एल ए ८३६०) घेऊन गेले होते. तर देवर्डे येथील आकाश तानवडे आपली तवेरा गाडी (एमएच ०४ ईएफ ९७१२) घेऊन गल्लीतील नातेवाईकांसह कोरिवडे (ता. आजरा) येथे पाहुण्यांकडे गेले होते.

ते आजर्‍याहून देवर्डे येथे जात असताना वेळवट्टी नजिकच्या धोकादायक वळणावर गोव्याहून पुण्याकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, तवेरा गाडी रस्त्याच्या बाजूला २० ते २५ फूट गेली.

या अपघातात आकाश तानवडे, बाबासाहेब तानवडे, शंकुतला तानवडे, लक्ष्मी तानवडे, लता मळेकर, गीता पाटील, राजेंद्र तानवडे, गीता मळेकर, भीमराव मळेकर, महेश्वरी तानवडे हे जखमी झाले आहेत. जखमींना आजरा ग्रामीण रूग्णालय व गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे या मार्गावरील वाहतून सुमारे दीड तास ठप्प झाली होती. आजरा महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

हेही वाचा

Back to top button