‘नीट’मध्ये कोल्हापूरचा टक्का वाढतोय!

‘नीट’मध्ये कोल्हापूरचा टक्का वाढतोय!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 7 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. त्या तुलनेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याने 'नीट'चा कोल्हापूर जिल्ह्यातील टक्का वाढत असल्याचे चित्र आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अभिमत विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीएस्सी नर्सिंग, युनानी मेडिकल, व्हेटरनरी आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) 'नीट'ची परीक्षा घेण्यात येते.

दहावीनंतर दोन वर्षे 'नीट'च्या परीक्षेचा अभ्यास केला जातो. यासाठी विद्यार्थी खासगी क्लासच्या माध्यमातून परीक्षेचा अभ्यास करतात. कोल्हापूर शहरात 50 तर जिल्ह्यात सुमारे 200 ते 250 जेईई/ नीट परीक्षेचे खासगी क्लास आहेत. फिजिक्स (180), केमेस्ट्री (180) व बायोलॉजी (360) असे मिळून 720 गुणांची परीक्षा असते. बारावीनंतर कितीही वेळा परीक्षा देता येते, त्यामुळे दिवसेंदिवस नीट परीक्षार्थींची संख्या वाढत आहे.

यंदा देशभरातून सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. त्यात 5 लाख 47 हजार विद्यार्थी तर 7 लाख 69 हजार विद्यार्थिंनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरणार्‍यांच्या संख्येत तब्बल दोन लाखांनी वाढ झाल्याने कट ऑफ वाढला आहे. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवता विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news