कोल्हापूर : हेरवाडमध्ये खासगी सावकाराचा वसुलीचा तगादा; एकाने सोडले गाव

कोल्हापूर : हेरवाडमध्ये खासगी सावकाराचा वसुलीचा तगादा; एकाने सोडले गाव

[author title="जमीर पठाण" image="http://"][/author]

कुरुंदवाड : शेडशाळ येथे सावकारीतून झालेल्या आत्महत्या प्रकरणानंतर हेरवाडातील खासगी सावकारांनी आपल्या वसुलीला जोर लावल्याची चर्चा आहे. सावकारांनी स्टॅम्प पेपरवर पीडितांच्या शेत-जमीन, घर मिळकत नावावर करून घेण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी रेल्वे सेवेतील पीडिताने गाव सोडले आहे. इतरांकडून ही वसुलीच्या वक्रद़ृष्टीने पीडितांना सावकारीच्या पाशात अडकवण्याचा फंडा काढल्याने येथील अनेकजण भीतीच्या छायेखाली आहेत.

रेल्वे सेवेतील कर्जदाराकडून 19 लाखांच्या बदल्यात 89 लाखांची वसुली करण्यासाठी त्याची वडिलोपार्जित शेती खरेदीसाठी या सावकाराने आपल्या बागेत माळी काम करणार्‍या, भिशीच्या प्रमोटरच्या माध्यमातून तगादा लावल्याचे बोलले जात आहे. शेडशाळ सावकारी प्रकरणावरून तालुक्यात सावकारी पाशाच्या वसुलीचा तगादाचे प्रकरण ताजे असतानाच हेरवाड येथे सावकाराकडून वसुली जोरात सुरू आहे. हे असेच राहिल्यास शेडशाळ आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती हेरवाडमध्ये व्हायला वेळ लागणार नाही.
सावकाराने पैशाच्या वसुलीसाठी आपल्या माळीकरवी तगाला लावला आहे. पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

कुटुंबे बनली निराधार

कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सैनिक टाकळी, शिरढोण, टाकळीवाडी, अकिवाट आणि दत्तवाड येथील सावकाराच्या तगाद्याने काहींनी आत्महत्या केली. सबळ पुरावे नसल्याने सावकारांनी घेतलेले स्टॅम्पच्या आधारे स्थावर-जंगम मालमत्ता खरेदी दाखवत आजपर्यंत सावकार यातून सही-सलामत सुटले आहेत. आत्महत्या केलेल्यांची कुटुंबे निराधार बनली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news