कोल्हापूर: शिरोली मिनी औद्योगिक वसाहतीतील रस्ता बनला डर्क ट्रॅक 

शिरोली मिनी औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर चिखल झाल्याने वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे.
शिरोली मिनी औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर चिखल झाल्याने वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे.

[author title="सुनील कांबळे" image="http://"][/author]
 शिरोली एमआयडीसी: शिरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोल्हापूर अॅक्सल कंपनीच्या पिछाडीस मिनी औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. या वसाहतीत सुमारे दोनशे लहान मोठे उद्योग आहेत. या उद्योगाकडे ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे. तोही अरुंद व अपुरा आहे. या रस्त्यावरुन एका वेळी एक वाहन जाऊ शकते. पावसामुळे या रस्त्याला ड्रट ट्रँकचे स्वरूप आले आहे. त्यातून वाहन धारकांनी कसरत करावी लागत आहे.

या औद्योगिक वसाहतीच्या पश्चिम बाजूला भलेमोठे सिमेंट गोडावून आहे. त्यामुळे दररोज दिवस रात्र अखंडपणे अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. ग्रामपंचायतीने टाकलेल्या मुरुमाचा अक्षरशः चिखल होऊन डर्क ट्रॅक झाला आहे.
या दलदलीतून उद्योजक व कामगारांना जीव मुठीत घेवूनच वाहन चालवावे लागत आहे. त्यामुळे वाहन धारकांच्यातून प्रचंड नाराजी व असंतोष व्यक्त होत आहे.

  ग्रामपंचायत कर थकबाकी लाखांच्या घरात

या औद्योगिक वसाहतीसाठी रस्ते, पाणी, वीजेची सोय ग्रामपंचातीकडून अद्याप झालेली नाही. त्यामुळे येथील उद्योजकांनी कर भरण्यास असमर्थता दाखवली आहे. ही थकीत रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे.

सिमेंट गोडावून मालकांवर कारवाई का नाही?

याठिकाणी कोल्हापूर येथील एका बड्या व्यक्तीची पाच ते सहा मोठी सिमेंट गोडावून आहेत. या गोडावूनमुळेच येथील रस्ताची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे रिक्षा , टेंपो, कार , मोटारसायकल चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वीज वितरणकडून सहकार्य नाही

या रस्त्याच्या कामामध्ये विद्युत पोल अडथळा ठरत आहे. हा पोल काढण्यासाठी महावितरण कार्यालयाला पत्र व्यवहार केला आहे. पण त्यांच्याकडून अद्याप कसल्याही प्रकारचे सहकार्य मिळालेले नाही. त्यामुळे या रस्त्याचे व ड्रेनेजचे काम करण्यास अडचण येत आहे.
–  पद्मजा करपे, सरपंच

या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे येथील उद्योजक, कामगार यांना त्रास होऊ लागला आहे. तरी संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी.
– शरद पाटील, उद्योजक.

प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करून वाहतूक सुस्थितीत होण्यासाठी प्रयत्न करू

– ए. वाय. कदम,  ग्रामविकास अधिकारी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news