ओमायक्रॉन : कोल्हापुरात परदेशातून १४४ प्रवासी दाखल - पुढारी

ओमायक्रॉन : कोल्हापुरात परदेशातून १४४ प्रवासी दाखल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून परदेशवारी करून आलेल्या प्रवशांचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि. 4) तब्बल 144 प्रवासी परदेशातून दाखल झाले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून या सर्वांचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 51 जणांना शोधण्यात आले असून, 93 जणांचा शोध सुरू आहे.

शहरात आतापर्यंत 67 जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर शनिवारी जिल्ह्यात 69 प्रवासी दाखल झाले. या सर्व प्रवाशांची यादी प्रशासनाला मिळाली असून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात दाखल झालेल्या 50 परदेशी प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून शनिवारी दोन जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी कोणाचाही अहवाल अद्याप कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही.

काही प्रवाशांचा संपर्क क्रमांक व पत्ता अपुरा असल्याने त्यांना शोधणे प्रशासनाला अवघड जात आहे. जिल्ह्यात आलेल्या एकूण परदेशी प्रवाशांपैकी शनिवारपर्यंत केवळ 51 जणांचा शोध लागला आहे. शहरामध्ये एकूण 67 जण आल्याची नोंद आहे. मात्र, यापैकी केवळ 24 जणांचा प्रशासनाला शोध लागला आहे.

Back to top button