Lok Sabha Election 2024 Results : अटीतटीच्या लढतीत हातकणंगलेतून धैर्यशील माने विजयी

Lok Sabha Election 2024 Results : अटीतटीच्या लढतीत हातकणंगलेतून धैर्यशील माने विजयी

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली आहे. या संघर्षपूर्ण झालेल्या निवडणुकीत माने यांनी ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील यांचा १४ हजार मतांनी पराभव केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकल्याने साऱ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. त्यामुळे पहील्या फेरीपासून कमालीची उत्कंठा लागली होती. या मतदारसंघात सुरवातीपासूनच शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने व ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यात चुरस पाहयला मिळाली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर हे आघाडीवर होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये कॉटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र, प्रत्येक फेरीत सत्यजीत पाटील व धैर्यशील माने यांच्यात मताधिक्य कमी-जास्त होत आहे. अखेरच्या काही फेरीमध्ये धैर्यशील माने यांनी बाजी मारत १४ हजार मतांनी विजय मिळवला.

हातकणंगले हा राज्यातील उस पट्ट्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. या कारणाने या मतदारसंघात उसाच्या व दुधाच्या राजकारणाचा निवडणुकीवर प्रभाव असतो. पण या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेच्या राजकारणाची दिशा बदलली. कारण राजू शेट्टी यांना या निवडणूक आपला म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही. निवडणूक निकालाच्या आधीच राजू शेट्टी यांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला होता. मात्र मतमोजणीत राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर गेल्याचे पहायला मिळाले. त्याचाच परिणाम म्हणून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील व विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यातच जोरदार लढत होताना दिसली.

अखेरच्या फेरीपर्यंत कमी-जास्त मताधिक्य होणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत शिंदेसेनेचे धैर्यशील माने १४ हजार ७२३ मतांनी विजय झाले. ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर १५ व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. पण १८ व्या फेरीअखेर धैर्यशील माने यांनी १२ हजार ११८ मतांनी आघाडी घेतली. माने विजयी होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news