Karnataka to Maharashtra : कर्नाटकचे प्रवासी विनातपासणी महाराष्ट्रात | पुढारी

Karnataka to Maharashtra : कर्नाटकचे प्रवासी विनातपासणी महाराष्ट्रात

कवठेगुलंद : पुढारी वृतसेवा

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासन महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांची दोन डोस व आरटी-पीसीआर चाचणी करूनच कर्नाटकात प्रवेश देत आहे. शिरोळ तालुक्यातून कर्नाटकला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून गणेशवाडी व आलास हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, आलास, गणेशवाडी येथे कोणत्याही तपासणीविना प्रवासी महाराष्ट्रात येत आहेत. (Karnataka to Maharashtra)

सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूची धास्ती आहे. अशावेळी या मार्गावर कर्नाटकातून येणारे प्रवासी कोरोना नियमांचे पालन न करताच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या प्रवाशांचे दोन डोस व आरटीपीसीआर तपासणी करूनच कर्नाटकात सोडले जाते. पण गणेशवाडी ते कागवाड व आलास ते मंगावती या मार्गाने कर्नाटकातून प्रवासी खूप मोठ्या संख्येने कोणतीही तपासणी न करता महाराष्ट्रात येतात. (Karnataka to Maharashtra)

त्यामुळे शिरोळ तालुका प्रशासनाने आलास व गणेशवाडी या कर्नाटक व महाराष्ट्र सीमेजवळ तपासणी नाका सुरू करून कर्नाटकप्रमाणे कोरोना लसीकरण, तपासणी, आरटी-पीसीआरचे बंधन घालणे आवश्यक आहे. दुसरीकडे कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे, तर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या प्रत्येक प्रवाशाची अडवणूक होत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

हेही वाचा :

Back to top button