Shirol’s politics : शिरोळचे राजकारण तापले; पडद्यामागील घडामोडी वेगावल्या

Shirol’s politics : शिरोळचे राजकारण तापले; पडद्यामागील घडामोडी वेगावल्या
Published on
Updated on

कोल्हापूर : संतोष पाटील

शिरोळ तालुक्याच्या निमित्ताने जिल्हा बँकेचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्यात शिष्टाई करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर याच गटातून माजी खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेट्टी यांच्या उमेदवारीने शिरोळमधील माघार नाट्य चांगलेच रंगण्याची शक्यता आहे. (Shirol's politics)

शिरोळ तालुका सेवा संस्था गटातून काँग्रेसचे गणपतराव पाटील यांनी 'अभी नहीं तो कभी नहीं' असा नारा देत सर्वपक्षीयांची मोट बांधत जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर याच गटाचे जिल्हा बँकेत नेतृत्व करतात. ना. यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात शिष्टाई करण्याचा प्रयत्न पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच केला होता. संघर्ष होऊ नये, यासाठी नेत्यांनी दोघांचीही समजूत काढत शिरोळ तालुक्यातील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्वभूमीवर ना. यड्रावकर यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी गणपतराव पाटील यांनीही शक्तिप्रदर्शनासह तब्बल सहा अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचा संकेत दिला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून जिल्हा बँकेसाठी 'स्वभिमानी'ला एका जागेची मागणी केली आहे. शिरोळ तालुका संस्था गट निवडणूक संघर्षाविना करण्यात शेट्टी एक दुवा असल्याचे मानले जाते. मात्र, शेट्टी यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल करत 'ट्विस्ट' आणली आहे. शिरोळच्या जागेवरून उद्भवलेला वाद मिटवताना नेत्यांचा मात्र कस लागणार आहे. (Shirol's politics)

उमेदवारीमागे अनेक पैलू

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील संघर्ष, स्वाभिमानी आणि शिवसेनेचा मतदारसंघात कमबॅकचा सुरू असलेला जोरदार प्रयत्न, पालकमंत्री सतेज पाटील यांनी गणपतराव पाटील यांच्या साथीने तालुक्यात वाढवलेली ताकद, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या जोडणीत ताणाताणीचे राजकारण, पालकमंत्री सतेज पाटील यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत तालुक्यातून मिळालेला काही नेत्यांचा बिनशर्त पाठिंबा, नाराजीचा सूर, चालढकलपणा असे अनेक पैलू शिरोळचा उमेदवार ठरवताना पुढे येणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पडद्यामागे घडणार्‍या घडमोडीत पुढील विधानसभा आणि नुकतीच झालेली विधान परिषद निवडणूक केंद्रस्थानी राहणार आहेत.

तडजोडीचे राजकारण

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्या तडजोडीच्या राजकारणात सर्वानुमते माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा एक पर्याय असला तरी स्वाभिमानीने एका जागेची मागणी केली आहे. विशेष मागास प्रवर्गातून संदीप कारंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, राजू शेट्टी सूचक आहेत. तडजोडीच्या राजकारणात या गटातील प्रतिनिधित्व मिळवण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असेल. (Shirol's politics)

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news